Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मलाही मराठी चित्रपटात काम करायचंय

मलाही मराठी चित्रपटात काम करायचंय
, गुरूवार, 21 ऑगस्ट 2014 (13:04 IST)
मराठी आई आणि पंजाबी पित्याची लेक असलेली प्रसिध्द अभिनेत्री श्रध्दा कपूरने मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सध्या जरी माझ्याकडे मराठी चित्रपटाच्या प्रतीक्षेत असल्याचं श्रध्दानं सांगितलं आहे. आपण मराठी चित्रपटात काम करण्यास कधीही नकार दिलेला नाही. त्यामुळं एखादी चांगली स्क्रिप्ट आल्यास नक्कीच मराठी चित्रपटात काम करेन असं आशिकी-2 आणि एक व्हिलन सारख्या सुपरहिट्स देणार्‍या श्रद्धानं सांगितलं आहे. 'लय भारी' सारख्या चित्रपटांमुळे मराठी फिल्म इंडस्ट्रीला नवी उर्जा मिळते. असे चित्रपट चांगली कमाई करत असल्यानं आपल्याला आनंद होत असल्याची प्रतिक्रिया श्रध्दाकपूरनं दिली. मराठी चित्रपटांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि सध्या प्रदर्शित होणार्‍या चांगल्या चित्रपटांमुळं मराठी चित्रपट सृष्टीला नक्कीच फायदा होईल असं मतही श्रध्दानं व्यक्तं केलं आहे. मला अद्याप मराठी चित्रपटाची विचारणा झालेली नाही. पण मी त्यासाठी कधीही नकार दिलेला नाही आणि मी एखाद्या चांगल्या संधीच्या शोधात असल्याचं श्रध्दानं सांगितलं. 
 
रितेश देशमुखचा पहिला मराठी चित्रपट असलेल्या लय भारीची सध्या महाराष्ट्रात जोरदार चर्चा आहे. रितेशनं एक व्हिलेनमध्ये श्रध्दा कपूरसोबत काम केलं होतं. तेव्हा त्यानं श्रध्दाला लय भारीचा प्रोमोही दाखवला होता. त्यामुळं मला रितेशचा लय भारी चित्रपट पाहायची खूप इच्छा असल्याचं श्रध्दानं सांगितलं आहे. श्रध्दा ही शक्ती कपूर आणि शिवांगी कोल्हापुरे यांची कन्या आहेत. श्रध्दाला पंजाबी बोलता येत नसलं तरी तिला मराठी उत्तमरीत्या बोलता येते. त्यामुळं बॉलिवूडमध्ये आपलं सौंदर्य आणि अभिनयानं सुपरस्टार बनलेल्या श्रध्दाची मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा कधी पूर्ण होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi