Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मल्लिकाला बॉयफ्रेंडसोबत रोमान्स करायचाय

मल्लिकाला बॉयफ्रेंडसोबत रोमान्स करायचाय
बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतने आपल्या प्रियकराची सर्वाशी ओळख करुन दिली आहे. मल्लिका पॅरिसला राहणारा रिअल इस्टेट एजंट सायरिल ऑक्जेनफेन्सच्या प्रेमात पडली आहे.
 
सायरिलसोबत मला इंडियन स्टाईल रोमान्स करायचा आहे, असं म्हणत त्याला मुंबईत बोलवायची इच्छा मल्लिकाने बोलून दाखवली आहे. तिने फेम या लाईव्ह व्हिडिओ सोशल प्लॅटफार्मवरुन जगभरातल्या चाहत्यांशी सायरिलची ओळख करुन दिली. ‘मला सायरिलचा अभिमान आहे. मी त्याला लवकरच मुंबईला बोलावणार आहे. त्याने मला पॅरिसमध्ये फिरवलं आणि फ्रेंच स्टाईल रोमान्स केला. आता मी भारतीय पद्धतीच्या प्रेमाचं दर्शन घडवेन. मी त्याला ताजमहाल दाखवायला नेईन आणि स्ट्रीड फूडही खायला देईन. त्याला टिपीकल इंडियन तडका दाखवायचा आहे.’ असं मल्लिका म्हणते. ‘मला फळं-भाज्या आवडतात, पण जेवण बनवायला आवडत नाही.’ अशी प्रांजळ कबुलीही यावेळी मल्लिकाने दिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi