Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मल्लिका चक्क अभिनय करतेय!

मल्लिका चक्क अभिनय करतेय!
IFMIFM
मल्लिका शेरावत चित्रपटांऐवजी इतर बाबींसाठीच जास्त चर्चेत असते. पण आता यापुढे आपल्या अभिनयाविषयी चर्चा होईल, असा तिचा दावा आहे.

मल्लिकाची 'मान गए मुगल-ए-आझम' व 'अगली और पगली' हे दोन चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत. एरवी चित्रपटात अंगप्रदर्शन आणि चुंबनदृश्ये नसतील तर म्हणे मल्लिकाच चित्रपट साईन करत नाही. पण या दोन चित्रपटात मात्र यातले काहीही नाही. या चित्रपटात आपण एका सशक्त भूमिकेत असून आपल्या अभिनयाविषयी लोकांना चर्चा करावी लागेल, असा विश्वास ती व्यक्त करते.

'अगली और पगली' हा चित्रपट प्रीतीश नंदी कम्युनिकेशनची निर्मिती आहे. या संस्थेच्या 'प्यार के साईड इफेक्ट्स' या चित्रपटात मल्लिकाने काम केले आहे. या चित्रपटात ती रणवीर शौरीबरोबर असेल. 'मान गए मुगल-ए-आझम'मध्ये ती राहूल बोसची नायिका आहे. के. के. मेनन आणि परेश रावल सारखे तगडे कलावंत तिच्याबरोबर आहेत. परेश रावल म्हणे तिच्या अभिनयाने भलतेच प्रभावीत झाले आहेत. संजय छैल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाकडून मल्लिकाला मोठ्या अपेक्षा आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi