Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मल्लिका शेरावतला हैदराबाद कोर्टाने बजावली नोटीस

मल्लिका शेरावतला हैदराबाद कोर्टाने बजावली नोटीस
हैदराबाद , मंगळवार, 5 ऑगस्ट 2014 (17:26 IST)
बॉलिवूडची अभिनेत्री मल्लिका शेरावतला हैदराबाद हायकोर्टाने नोटीस बजावली आहे. 'डर्टी पॉलिटीक्स' या सिनेमाच्या पोस्टरमध्ये मल्लिकाने राष्ट्रध्वज कमरेला गुंडाळल्याचे दाखवले आहे. याविरोधात सामाजिक कार्यकर्ते टी धनगोपाल राव यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. 
 
याप्रकरणी कोर्टाने मल्लिकासह सिनेनिर्माते के.सी. बोकाडिया तसेच केंद्र सरकारलाही नोटीस बजावली आहे. ‘डर्टी पॉलिटिक्स’ सिनेमाचे हे  पोस्टर अश्लील असून त्यावर बंदी घालावी अशी मागणीही राव यांनी केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi