नागराज मंजुळेंच्या ‘सैराट’ चित्रपटामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला परशा अर्थात आकाश ठोसर आता नव्या इनिंगला सज्ज झाला असून महेश मांजरेकरसोबत त्याची ही नवी इनिंग रंगणार आहे. आकाशला महेश मांजरेकर यांनी त्यांच्या नव्या चित्रपटासाठी कास्ट केले आहे.
या चित्रपटात तो हिरो म्हणून झळकणार आहे. सध्या तरी या चित्रपटाचे नाव जाहीर झाले नसले तरी चित्रपटाचे शूटिंग मात्र सुरु झाले आहे. सध्या परशा मुंबईतल्या गोरेगाव फिल्म सिटीमध्ये शूटिंग करत आहे. त्यामुळे ‘सैराट’ला मिळालेले यश फक्त चित्रपटापुरतेच मर्यादित राहिले नसून त्याचा परिसस्पर्श यातल्या कलाकारांनाही झाला आहे, असेच म्हणावे लागेल.