Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

माझं 75 टक्के यकृत निकामी: अमिताभ बच्चन

माझं 75 टक्के यकृत निकामी: अमिताभ बच्चन
महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या प्रकृतीबद्दल अतिशय गंभीर आणि धक्कादायक माहिती दिली आहे, आपले लिव्हर हे फक्त 25 टक्के ठीक असल्याचे महानायकाने स्पष्ट केले आहे. अमिताभ बच्चन यांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून चालवल्या जाणार्‍या, हेपेटायटीस बी विरोधी मोहिमेचे ब्रॅड अँम्बेसिडर बनवण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. 
 
हेपेटायटीस बी असल्याचे आपल्याला 2000 साली समजल्याचे बच्चन यांनी म्हटले आहे. जेव्हा 33 वर्षापूर्वी शुटिंगदरम्यान बच्चन जखमी झाले होते, तेव्हा काही लोकांनी त्यांच्यासाठी रक्तदान केले होते, तेव्हा त्यातील एक व्यक्ती हेपेटायटीस बी ग्रस्त होता, तो आजार नंतर बच्चन यांच्याही वाटेला आला. बच्चन यांना या आजाराची माहिती रेग्युलर चेकअपच्यावेळी 2000 साली देण्यात आली.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi