Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

माधुरी-रणबीर एकत्र नाही

माधुरी-रणबीर एकत्र नाही
GG
धक धक गर्ल माधुरी दीक्षित म्हणे रणबीर कपूरबरोबर 'द्रौपदी' नावाची फिल्म करतेय अशी बातमी मध्यंतरी कुणी तरी पेरली होती. त्याचे दिग्दर्शन म्हणे प्रकाश झा यांच्याकडे आहे. एका युवकाचे मध्यमवयीन महिलेशी जमलेले प्रेम हा त्याचा विषय होता.

प्रकाश झा यांच्याबरोबर माधुरीने मृत्यूदंड हा सिनेमा केला आहे. शिवाय आता 'राजनिती' हा सिनेमा झा रणबीर कपूरबरोबर करताहेत. त्यामुळे ही बातमी खरी असावी असे मानण्यात आले होते. शिवाय ती अमेरिकेत माधुरीपर्यंत जाऊन पोहोचली.

मग माधुरीने थेट प्रकाश झा यांना फोन लावून या बातमीचे खंडन करायला लावले. सध्या आपण 'राजनिती' या चित्रपटात व्यग्र असून असा कोणता चित्रपट बनविण्याच आपला इरादा नसल्याचे झा यांनी स्पष्ट केले. माधुरी जूनमध्ये भारतात येणार आहे. त्यावेळी ती एखादा चित्रपट साईन करेल अशी अपेक्षा आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi