Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुग्ध करण्यात मुग्धाला अपयश

मुग्ध करण्यात मुग्धाला अपयश

वेबदुनिया

, गुरूवार, 26 मार्च 2009 (12:29 IST)
IFMIFM
गेल्या वर्षी अनेक नायिका बॉलीवूडमध्ये आल्या. अनुष्का शर्मा, असीन व मुग्धा गोडसे यातील प्रमुख आहेत. पण अनुष्का व असीनच्या तुलनेत मुग्धा गोडसेची चर्चा फारशी झाली नाही.

पुरस्कार सोहळ्यातही या दोघींचाच प्रभाव राहिला. दोघींनाही नवोदित अभिनेत्रींसाठीचे पुरस्कार मिळाले. मुग्धाची यातही उपेक्षाच झाली. एखादा तरी पुरस्कार आपल्याला मिळावा अशी मुग्धाची अपेक्षा होती. पण तिची अपेक्षा काही पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे ती सध्या वैतागली आहे.

नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कार पहिला चित्रपट करणार्‍या नायिकेलाच मिळायला हवा, असे मुग्धाचे म्हणणे आहे. तिचा रोख असीनकडे आहे. असीनने हिंदीव्यतिरिक्त अनेक चित्रपटात काम केले आहे. त्यामुळे तिला डावलून आपल्याला पुरस्कार मिळायला हवा होता, असे मुग्धाला वाटते.

फॅशनमध्ये मुग्धाचा अभिनय चांगला होता. इतर अभिनेत्रींच्या तुलनेत आपण कुठेही कमी पडलो नाही. तरीही पुरस्कार काही मिळाला नाही, या दुःखात सध्या मुग्धा आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi