Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुन्नाभाई आत्मकथा लिहिणार

मुन्नाभाई आत्मकथा लिहिणार

वेबदुनिया

मुंबई , सोमवार, 28 जून 2010 (11:30 IST)
आपल्याला आपल्या जीवनातील विविध घडामोडींवर लिहिण्याची इच्छा असून, यासाठी आपण लवकरच पुस्तक लिहिणार असल्याचे मुन्नाभाई संजय दत्तने स्पष्ट केले आहे.

संजय दत्तच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले आहेत. त्याला ड्रग्स प्रकरणी अटक करण्यात आली होती. यानंतर मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातही त्याचे नाव आल्यानंतर त्याला शिक्षा झाली आहे.

संजय दत्तच्या पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्याने दुसर्‍यांदा विवाह केला असून, तो पुन्हा बाप होणार असल्याने सध्या तो खूश आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi