Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

म्युझिक कम्पोजर आदेश श्रीवास्तव यांना दुसर्‍यांदा कँसर

म्युझिक कम्पोजर आदेश श्रीवास्तव यांना दुसर्‍यांदा कँसर
, सोमवार, 31 ऑगस्ट 2015 (17:36 IST)
बॉलीवूडचे म्युझिक कंपोजर आदेश श्रीवास्तव मुंबईच्या कोकिलाबेन दवाखान्यात भर्ती आहे आणि त्यांची हालत गंभीर आहे. आदेश श्रीवास्तव कँसर रोगापासून पीडित आहे. कँसरच्या आजारपणापासून दुसर्‍यांदा लढत असलेले आदेश मागील काही वेळापासून दवाखान्यात भरती आहे. सांगायचे म्हणजे, पाच वर्ष अगोदर त्यांना कँसर झाला होता आणि उपचार केल्याने ते ठीक झाले होते.  
 
लता मंगेशकरने यांनी आदेशसाठी देवाकडे प्रार्थना करत ट्विट करून त्यांचे लवकर बरे होण्याची प्रार्थना केली आहे. लता यांनी ट्विटरवर लिहिले, "मला आजच कळले की संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचे आरोग्य खराब आहे. मी त्यांच्या उत्तम प्रकृतीसाठी देवाकडे प्रार्थना करते."
 
कार विकून मागच्या वेळेस केला होता उपचार 
साल 2011मध्ये आदेशला कँसरच्या आजाराबद्दल कळले होते. त्या वेळेस तो या गोष्टीमुळे परेशान होता की अशा दुःखाच्या काळात बॉलीवूड इंडस्ट्रीच्या लोकांनी त्याला काहीही मदत केली नव्हती. आजारपणापेक्षा त्याला एकटेपणा जास्त त्रासदायक वाटत होता. आदेशचे म्हणणे आहे की आजारपणाचे माहीत पडल्यानंतर कोणीही त्याला भेटायला देखील आले नव्हते. मागच्या वेळेस त्याची महागडी कार विकून त्याने आपल्या बिमारीचा उपचार केला होता.  
 
'रिफ्यूजी'साठी मिळाला होता IIFA
राजनीति (2010), बागबान (2003), कभी खुशी कभी गम (2001), रहना है तेरे दिल में (2001) सारखे चित्रपटाचे म्युझिक डायरेक्टर असलेले आदेश श्रीवास्तव यांना वर्ष 2000 मध्ये आलेले चित्रपट 'रिफ्यूजी'साठी आयफा अवॉर्ड मिळाला होता.   
webdunia
Lata Mangeshkar ‏@mangeshkarlata  Aug 30
Mujhe aaj pata chala ki Sangeetkar Aadesh Shrivastava ji ki tabiyat kharab hai.Main unki acchi sehat ke liye ishwar se prarthana karti hun.

Share this Story:

Follow Webdunia marathi