Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रणबीरचे नवे प्रेम

रणबीरचे नवे प्रेम
कॅटरिना कैफसोबत ब्रेकअप झाल्याच्या बातम्यांनी चर्चेत असलेल्या रणबीर कपूरला नवे प्रेम सापडले आहे. अर्थात ही कोणी गर्लफ्रेंड नाही तर ती आहे रणवीरची ब्रँड न्यू ब्ल्यू कलरची रेंजरोव्हर कार. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी या कारमधून रणबीर मुंबईच्या उपनगरातून फिरत होता. तो येथे त्याच्या आगामी ए दिल है मुश्कील चित्रपटाचा दिग्दर्शक करण जोहरबरोबर पार्टीसाठी आला होता असे समजते. 
 
रणबीर कपूरने नवी निळी रेंजरोव्हर घेतली आहे व त्यासाठी स्पेशल नंबरही मिळविला आहे. हा नंबर त्याला ऑस्ट्रॅलॉजीप्रमाणे लकी नंबर आहे. या रेंज रोव्हरशिवाय रणबीरकडे कस्टमाईज करून घेतलेली सफेद कलरची ऑडी ए 8, लाल रंगाची ऑडी आर आठ, शानदार मर्सिडीज बेंझ जी 63 व आणखी एक रेंज रोव्हर या गाड्याही आहेत.
 
रणबीरचे वडील ऋषी कपूर यांच्या ताफ्यात तर 45 कार असल्याचे सांगितले जाते.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi