Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रणबीरला 21 कोटीत पडेल कॅटशी ब्रेकअप

रणबीरला 21 कोटीत पडेल कॅटशी ब्रेकअप
, बुधवार, 27 जानेवारी 2016 (17:08 IST)
कॅटरीना कैफ आणि रणबीर कपूर वेगळे झाले आहे अशी चर्चा असली तरी ते दोघेही प्रोफेशनल आहेत आणि आगामी चित्रपट जग्गा जासूस पूर्ण करतील. पण सध्या ते वेगळे राहायला लागले आहे.
 

काही दिवसांपूर्वीच सिल्वर सँड्स येथे दोघांनी उत्साहाने पेंटहाउस भाड्याने घेतला होता. ज्याचं भाडं 15 लाख रुपये दरमाह होतं. एवढंच नव्हे तर रणबीरने सिक्युरिटी म्हणून येथे 21 कोटी रुपये जमा केले होते. या पेंटहाउसला दोघाने मिळून सजवलेही होते.
 
ब्रेकअपनंतर आता रणबीर हिल रोड स्थित विल्सन अपार्टमेंट येथे राहायला गेला असून त्याने येथे आपल्या मित्रांसोबत पार्टीदेखील केली.
 
चर्चा आहे की नियमांप्रमाणे रणबीरला सिक्युरिटी डिपॉझिटवर पाणी सोडावे लागणार आहे. तसेच रणबीर ती रक्कम मिळवण्यासाठी प्रयत्नही करत नाहीये कारण तिथे कॅटरीना राहते. म्हणजे कॅटशी ब्रेकअप रणबीरला 21 कोटी रुपयात पडू शकतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi