Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रणबीर कपूरविरोधात फसवणुकीचा गुन्हा

रणबीर कपूरविरोधात फसवणुकीचा गुन्हा
, बुधवार, 23 सप्टेंबर 2015 (11:27 IST)
बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तर यांना ऑनलाईन शॉपिंग साईटची जाहिरात करणं चांगलंच महागात पडलं आहे. askmebazaar.com कंपनीच्या जाहिरातीतून दिशाभूल केल्याप्रकरणी दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
लखनऊमध्ये राहणारे वकील रजत बन्सल यांनी मदियार पोलीस स्टेशनमध्ये फरहान आणि रणबीर विरोधात गुन्हेगारी स्वरुपाचा विश्वासघात (कलम 406) आणि फसवणूक (कलम 420) केल्याची तक्रार नोंदवली आहे. रणबीर, फरहानसोबतच askmebazaar.com च्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सविरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बन्सल यांनी 23 ऑगस्टला 29 हजार 999 रुपये किमतीचा 40 इंचांचा एलईडी टीव्ही askmebazaar.com.लेा या ऑनलाईन शॉपिंग साईटवर मागवला होता. मात्र 10 दिवसांत टीव्हीची डिलिव्हरी करण्याचं आश्वासन पाळलं नसल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे. ‘फरहान आणि रणबीरसारख्या सेलिब्रेटींच्या भूलथापांना बळी पडून अनेक जण प्रॉडक्ट बुक करतात. मात्र कंपनी त्यांनी ऑर्डर केलेली वस्तू न पाठवता फक्त बिल पाठवून त्यांची फसवणूक करते,’ असा आरोपही रजत बन्सल यांनी केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi