Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राखीला बनायचे आहे पॉर्नस्टार

राखीला बनायचे आहे पॉर्नस्टार
, गुरूवार, 11 फेब्रुवारी 2016 (09:45 IST)
वाद आणि चर्चा ही बॉलिवूडच्या आयटम गर्ल राखी सावंतचे नाव घेतल्यावर झालीच पाहिजे. पण राखी सावंत हिने आता एक असे वक्तव्य केले आहे जे ऐकून कदाचित तुम्हाला धक्का बसेल.
 
राखी सावंतला पत्रकारांनी एका इव्हेंटदरम्यान प्रश्न विचारला की, अभिनेता आमिर खान हा सनी लिओनला सपोर्ट करतो. यावर प्रतिक्रिया देताना राखीने म्हटले की ही एक चांगली बातमी आहे आणि राखी सावंतदेखील लवकरच पॉर्न स्टार बनणार आहे. आधीपासूनच सनी लिओन आणि राखी सावंत यांच्यात पटत नाही. राखी सावंतने याआधीही सनी लिओनवर शाब्दिक हल्ला केला होता. राखी सावंतने सनी लिओनवर हल्ला बोल करत ज्या क्षेत्रातून ती आली आहे तेथे सनीने परत जावे असा सल्ला देऊ केला होता. मात्र आता राखी सावंतने पॉर्न इंडस्ट्रीत जाणार आणि पॉर्नस्टार बनणार असल्याचे जाहीर केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi