Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राजा नटवरलालचे प्रमोशन

राजा नटवरलालचे प्रमोशन
, बुधवार, 13 ऑगस्ट 2014 (14:32 IST)
अभिनेता इम्रान हाश्मी सध्या ‘राजा नटवरलाल’ या आगामी सिनेमाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. या निमित्त तो मुंबईमधील पीव्हीआर थिएटरमध्ये पोहोचला होता. इथे त्याने त्याच्या सिनेमाचे खूपच वेगळ्या अंदाजात प्रमोशन केले. यावेळी त्याने पीव्हीआरच्या कर्मचार्‍यांना टी-शर्टस् वाटले. टी-शर्टस्वर ‘मैं हू राजा नटवरलाल’ असे लिहिलेले होते. इम्रानसह सिनेमाची अभिनेत्री हुमैमा मलिक आणि दिग्दर्शक कुणाल देशमुखसुध्दा दिसला. हा सिनेमा येत्या 29 ऑगस्ट रोजी रिलीज होत आहे. सिनेमात इम्रान शिवाय परेश रावल, के के मेनन आणि दीपक तिजोरी यांच्याही भूमिका आहेत. सिध्दार्थ रॉय कपूरने सिनेमाची निर्मिती केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi