Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राजेश खन्ना यांना पुरस्कार

राजेश खन्ना यांना पुरस्कार
आता वेध लागले आहेत ते आयफा पुरस्कारांचे. येत्या ११ ते १३ जूनला या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. यात दरवर्षी ज्येष्ठ कलावंतांना लाईफटाईम अचिव्हमेंट अवार्ड दिले जाते. यंदा या पुरस्काराने माजी सुपरस्टार राजेश खन्ना यांना सन्मानित केले जाणार आहे. आराधना, अमर प्रेम, सफर, कटी पतंग असे अनेक हिट चित्रपट देणार्‍या राजेश खन्ना यांनी एक काळ गाजवला होता. त्यांच्या चित्रपटांइतकेच त्याचे संगीतही लोकप्रिय ठरले होते. बर्‍याच दिवसांपासून काका पडद्यावर दिसत नाहीयेत. पण या निमित्ताने आता ते पुन्हा फोकसमध्ये येतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi