Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रेखा बनतेय 'सुपर नानी'

रेखा बनतेय 'सुपर नानी'
, शनिवार, 23 ऑगस्ट 2014 (18:10 IST)
वयाच्या या टप्प्यावरही जिला सौंदर्यवती मानलं जात, ती रेखा अगदी कमी चित्रपट करते, मात्र तिचा प्रत्येक चित्रपट चर्चेत येतो. सध्या ती आपल्या वयाला साजेशा भूमिका करतेय. आता तिचा नवीन चित्रपट येतोय 'सुपर नानी'. त्यात तिने चक्क आजीची भूमिका केली आहे. 'सुपर नानी' मधून एक स्ट्रांग मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे.

तो असा की, महिलांनी स्वत:मध्येच दडलेल्या शक्तीरूपाचा शोध घेऊन ती वापरली पाहिजे. रेखाने भारती भाटिया नामक स्त्रीची भूमिका केली आहे आणि यात तिचा नातू झालाय शर्मन जोशी. हा चित्रपट म्हणजे हसू-आसू, आणि काही आनंदी आठवणी यांचे मिश्रण आहे तसेच तो एक संदेशही देईल. या चित्रपटाची निर्मिती इन्द्राकुमार यांची असून दिग्दर्शनही त्यांचेच आहे. आता रेखा आजीच्या भूमिकेत जरी असली तरी ती ग्रेसफूलच यात शंकाच नाही. 

Share this Story:

Follow Webdunia marathi