Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रोहन सिप्पी रियावर नाराज

रोहन सिप्पी रियावर नाराज
, सोमवार, 22 सप्टेंबर 2014 (14:01 IST)
सोनाली केबल या चित्रपटाच्या प्रदर्शन होण्याच्या तारखेमध्ये बदल केल्यामुळे त्यांना आता चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुख्य नायिका असलेल्या रिया चक्रवर्तीकडून वेळ मिळेनासा झाल्यामुळे चित्रपटाचे निर्माते रोहन सिप्पी सध्या रियावर नाराज आहेत. येत्या 17 ऑक्टोबरला सोनाली केबल हा चित्रपट प्रदर्शित होत असून या तारखेच्या आठवडाभरापूर्वी हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे ठरवण्यात आले होते. त्यांच्या मते, त्यांनी काही आठवड्यांपूर्वीच रिलीज डेटमधील बदलांबाबत कलाकारांना कल्पना दिली होती. ते सांगतात, ‘आम्ही कलाकारांना याबाबत आधीच कल्पना दिली होती. पण रियाकडून आम्हाला पुरेसा वेळ मिळत नाहीय. ती चित्रपटात टायटल भूमिकेत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi