Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लाडली, पण न बिघडलेली..

लाडली, पण न बिघडलेली..
, मंगळवार, 4 मार्च 2014 (16:22 IST)
‘लाडक्या बापाची लाडकी लेक’ असं तिचं बॉलिवूडमध्ये वर्णन केलं जातं. आणि ती तशीच आहे, पण लाडाने बिघडलेली मात्र अजिबात नाही. किंबहुना, मी जे करेन ते योग्यच आहे याची ग्वाही माझ्या वडिलांकडूनच तुम्हाला मिळेल, असं सोनम कपूर ठणकावून सांगते. 
 
पण तिचं म्हणणं अजिबात चुकीचं नाही हे तिच्या बिकिनी दृश्यावरून जो गहजब झाला आहे त्यावर अनिल कपूर यांनी केलेल्या विधानावरूनच सिद्ध झालं आहे. 
 
‘बेवकूफियाँ’ या आगामी चित्रपटासाठी सोनमने बिकिनी दृश्य दिलं आहे. त्यावरून तिच्यावर सध्या प्रश्नांचा भडिमार चालू आहे. अनिल कपूर यांनी मात्र तुझ्या या दृश्याने चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळेल, असं माफक उत्तर देऊन सोनमच्या कृतीला दुजोरा दिला आहे. 
 
त्यांच्या या अत्यंत समजूतदार आणि व्यावहारिक स्वभावामुळेच आमचं घर चित्रपटसृष्टीत रंगलंय.

Share this Story:

Follow Webdunia marathi