Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लायकी नसलेल्यांना अधिक महत्व नको नानाची सलमांनवर टीका (Video)

लायकी नसलेल्यांना अधिक महत्व नको नानाची सलमांनवर टीका (Video)
, सोमवार, 3 ऑक्टोबर 2016 (10:51 IST)
जम्मू  काश्मीर येथे उरी हल्ल्यानंतर सर्व स्तरातून पाकिस्तान वर टीका होत आहे. तर यावेळी आपल्या देशातील बदनाम असलेला  त्यानंतर पाक कलाकारांची पाठराखण करणारा बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानला नाना पाटेकरांनीही चांगलेच फटकारले असून सलमानची लायकीच त्यांनी काढली आहे.
 
देशाचे खरे असलेले  हिरो सीमेवर लढणारे जवान आहेत. त्यामुळे लायकी नसलेल्यांना  मूर्खाना  उगाच महत्त्व देऊ नका, अशा शब्दात नाना पाटेकर यांनी नाव न घेता सलमान खानला टोला हाणला. पुण्यात एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर नानांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
 
‘सगळ्यात आधी देश, त्यानंतर आम्ही कलाकार, कलाकारांची किंमत देशासमोर शून्य असते. ज्यांची लायकी नाही त्यांना महत्व देऊ नका, खरे हिरो आपले जवान आहेत, आम्ही नकली लोक आहोत, आम्हाला इतकं महत्त्व देऊ नका’ अशी विनंतीही नानांनी केली.
 
 
इतर वर्गासारखे आपण ,मुस्लीम लोकांकडे फार दुर्लक्ष केले आहे.त्यांनाही आता मदत करत नवीन सुधारणा त्यांच्या पर्यंत पोहचवल्या पाहिजेत असेही नाना यांनी सांगितले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तृप्ती स्वप्नील सोबत करणार मराठी केबीसी