Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लेकींकडे दुर्लक्ष करणार्‍यांच्या फोनला सेल्फी कॅमेरा नसतो: श्रुती

लेकींकडे दुर्लक्ष करणार्‍यांच्या फोनला सेल्फी कॅमेरा नसतो: श्रुती
, मंगळवार, 30 जून 2015 (10:20 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’मधून बेटी बचावचा नारा देत ट्विटरवर सेल्फी विथ डॉटर हॅशटॅगसह आपल्या मुलींसोबतचे फोटो शेअर करण्याचं आवाहन केलं. 
 
पंतप्रधानांच्या आवाहनाला ट्विटराईटस्नी जोरदार प्रतिसाद देत आपल्या लेकीसोबत फोटोही शेअर केले. मात्र अभिनेत्री श्रुती सेठने पंतप्रधानांच्या या उपक्रमाला आक्षेप नोंदवला आहे. सेल्फी हे बदल घडवून आणण्याचं साधन नाही, पंतप्रधानांनी हे लक्षात ठेवावं, असं श्रुती म्हणते. 
 
‘पंतप्रधानांच्या सेल्फी प्लॅनला पाठिंबा दर्शवणार्‍यांनी हे लक्षात ठेवावं की लेकींकडे दुर्लक्ष करणार्‍या निरक्षर पालकांच्या मोबाइलमध्ये सेल्फी कॅमेरा नसतो.’ थोडक्यात, सेल्फी काढणार्‍या, ट्विटरवर असणार्‍या व्यक्तींना ‘बेटी बचाव’चं महत्त्व सांगण्याची आवश्यकता नसते, ज्यांच्यामध्ये ही जागृती करण्याची गरज आहे, ते पालक निरक्षर असतात असं श्रुतीला सुचवायचं आहे. 
 
पंतप्रधानांनी सेल्फी-प्रेमातून स्वत:ला लांब ठेवायची गरज आहे, असंही श्रुतीने ट्विटरवर म्हटलं आहे. श्रुतीने गेल्याच वर्षी एका मुलीला जन्म दिला आहे. सध्या आपण फुल टाइम आई असल्याचं तिने ट्विटरवर म्हटलं आहे. श्रुतीने काही वर्षापूर्वी गाजलेल्या ‘शरारत’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. ‘मॉम, तुम और हम’ सारख्या काही टीव्ही शोनंतर ‘फना’ चित्रपटातही श्रुती दिसली होती.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi