Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वरूणकडे दिग्दर्शकांची रांग

वरूणकडे दिग्दर्शकांची रांग
, शुक्रवार, 3 जुलै 2015 (10:48 IST)
गेल्या चार वर्षात सलग पाच हिट चित्रपट देणारा वरूण धवन अधिकच बिझी झाला आहे. त्यामुळे वरूणचा सक्सेस रेट 100 टक्के बनला आहे. बदलापूर हा त्याचा पहिला चित्रपट हिट झालाच पण नुकताच प्रसिद्ध झालेला एबीसीडी टूनेही चांगलेच यश मिळविले आहे. विशेष म्हणजे रमजान सुरू असतानाही या चित्रपटाला चांगले ओपनिंग मिळाले आहे. या चित्रपटाने 10 दिवसांत 90 कोटींचा गल्ला गोळा केला आहे.
 
त्याच्या समकालीन अन्य हिरोंच्या तुलनेत वरूणकडेच सध्या सर्वात जादा चित्रपट ऑफर्स आहेत. तो सध्या शाहरुखबरोबर दिलवालेमध्ये काम करत आहे आणि अनेक उत्तमोत्तम चित्रपट त्याच्या खिशात आहेत. वडील डेव्हिड धवन यांच्याकडेही त्याच्यासाठीचे स्क्रिप्ट तयार आहे पण वरूणला वडिलांना तारखा देणेही अवघड बनले असल्याचे सांगितले जात आहे. कोणते चित्रपट स्वीकारायचे याचा सल्ला मात्र तो करण जोहरकडून घेतो. करणच्या शुद्धीमध्ये आणि रोहित शेट्टीच्या राम लखन रिमेकमध्येही वरूण दिसणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi