Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विद्यानं केलं चाहत्यांना खूश

विद्यानं केलं चाहत्यांना खूश

वेबदुनिया

WD
विद्या बालनची लोकप्रियता तुफान आहे. इतकी, की ती आहे एवढं समजलं, तरी तिथं प्रचंड गर्दी होते. ‘बॉबी जासूस’ या सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान हेच झालं. तिचं शूटिंग सुरू आहे, हे समजल्यावर त्या ठिकाणी चाहत्यांची गर्दी उसळली. प्रत्येकाला एकदा तरी विद्याला पाहायचं होतं. गर्दी अनावर होऊ पाहात होती. शेवटी या सिनेमाचा निर्माता साहिललाच कल्पना सुचली. तो सरळ विद्याकडे गेला आणि तिला परिस्थिती सांगितली. मग काय, विद्यानं काही वेळापुरतं काम थांबवलं आणि साहिलसोबत बाहेर आली. चाहत्यांना भेटली. त्यांच्याशी चार शब्द बोलली. मग चाहतेही आनंदात आपापल्या मार्गाला लागले आणि विद्यानं पुन्हा शूटिंग सुरू केलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi