Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विद्या होणार कोणाची पडोसन?

विद्या होणार कोणाची पडोसन?
, शुक्रवार, 11 एप्रिल 2014 (12:58 IST)
किस्मत कनेक्शन चित्रपटात लोकांमध्ये प्रचलित झालेली शाहिद कपूर आणि विद्या बालन ही जोडी येत्या काही दिवसात शेजारी-शेजारी येणार असल्याचे कळतंय. विशेष म्हणजे एके काळी विद्या बालन आणि शाहिद कपूर यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा कानावर ऐकू येत होत्या. काही दिवसांपूर्वीच शाहिद कपूरने विद्या बालनच्याच हाउसिंग सोसायटीमध्ये घर घेतलं आहे. या घराची किंमत 32 कोटी रुपये असल्याचे सांगितलं जातंय. विद्या बालनने 2012 मध्ये सिद्धार्थ रॉय कपूरसोबत लग्न केल्यापासून विद्या आणि शाहिद यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा बंद झाल्या होत्या. पण अचानक शाहिदने विद्याच्या सोसायटीमध्ये राहण्याचा निर्णय घेतल्याने, पुन्हा शाहिद कपूर आणि विद्या बालन यांच्या बाबतीत बॉलिवूडमध्ये चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi