Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वीणा मलिकाचा शेवटचा दाव

वीणा मलिकाचा शेवटचा दाव

वेबदुनिया

, गुरूवार, 17 जानेवारी 2013 (12:27 IST)
हॉट फोटो ते एमएमएस सर्वकाही वीणा मलिकने लीक करवले, पण त्याने तिच्या करियरमध्ये काही जास्त फरक दिसून
आलेला नाही. बिग बॉसपासून बॉलीवूडमध्ये पाय ठेवणारी वीणाला गैरसमज झाला होता की ज्या प्रकारे तिला शोमध्ये पसंत
केले गेले होते, तसेच तिचे चित्रपट पाहण्यासाठी लोकांची गर्दी होईल पण तिला हे माहीत नव्हत की फुकटाचे मनोरंजन
काही वेगळेच असते आणि पैसे देऊन तिकिट विकत घेऊन मनोरंजन एक वेगळी गोष्ट आहे.

वीणाचे चित्रपट ‘दाल में कुछ काला है’मध्ये प्रेक्षकांना काळाच दिसला. काही चित्रपटांमध्ये आयटम सांग केले, पण तिला
त्याचा काहीच फायदा झालेला नाही आहे. वीणाशी निगडित सूत्रांनी सांगितले की सध्या ती फारच उदास आहे, पण तिने
हिंमत हरलेली नाही आहे. मुंबई 125 किमी नावाचे तिचे चित्रपट या वर्षी रिलीज होणार आहे. हे एक हॉरर चित्रपट आहे
जे थ्री-डी मध्ये तयार करण्यात आले आहे.

वीणाला उमेद आहे की ज्या प्रकारे बिपाशा बसुने ‘राज 3’ नावाचे हॉरर चित्रपटातून वापसी केली आहे त्याच प्रकारे तिचे
हॉरर चित्रपटदेखील तिच्या करियरमध्ये महत्त्वाचा टप्पा असेल. आता आपण उमेदच करू शकतो की तिचा हा शेवटचा दाव
यशस्वी होईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi