Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वेळेवर जाऊन नाचगाणी करणार्‍यांनाच पुरस्कार मिळतो

वेळेवर जाऊन नाचगाणी करणार्‍यांनाच पुरस्कार मिळतो
, मंगळवार, 20 सप्टेंबर 2016 (12:17 IST)
बॉलिवूडच्या चित्रपटांना मिळणार्‍या पुरस्कारांबद्दल नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. बॉलिवूड चित्रपटांना मिळणारे पुरस्कार हे फिक्स असतात अशी टीकाही अनेक जण करतात. 
 
या वादावर आता अभिनेता अजय देवगणनंही वक्तव्य केलं आहे. अजय देवगण निर्मित पाच्र्ड या चित्रपटाचं आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक होत आहे. यावरूनच अजय देवगणनं पुरस्कार सोहळ्यांची खिल्ली उडवली आहे. 
 
पुरस्कार सोहळ्याला जो वेळेवर जातो आणि जो नाचगाणी करतो त्याला पुरस्कार दिला, अशाप्रकारचे हे पुरस्कार नसतात असं अजय देवगण म्हणाला आहे. पुरस्कार सोहळ्यांना जेवढे जास्त अभिनेते-अभिनेत्री येतात तेव्हा अनेक चॅनल्स हे पुरस्कार सोहळे 
 
विकत घेण्यासाठी उत्सुक होतात, त्यामुळे जास्त पैसे मिळतात. पुरस्कार सोहळे पैसे कमावण्याचं साधन झालं असल्याची प्रतिक्रिया अजय देवगणनं दिली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बाजीराव WhatsApp वर