Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शाहरुखचा ‘यश’मंत्र

शाहरुखचा ‘यश’मंत्र
, मंगळवार, 25 नोव्हेंबर 2014 (12:03 IST)
शाहरुख खान हा बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेता आहे. मात्र ही यशस्वीता अशीच मिळालेली नाही. त्यासाठी त्याला प्रत्येक पावलावर परिस्थितीशी झगडावे लागले आहे. या संकटकाळी त्याला त्याच्या आईने दिलेला ‘यशमंत्र’ कायम स्मरणात राहिला. हा यशमंत्र सतत मनात उच्चारत राहिलनेच तो आज या अढळस्थानी येऊन पोहोचला आहे. नुकतीच शाहरुख खानची एका प्रसिद्ध फायनान्स कंपनीकडून त्यांचा ब्रॅन्ड अँम्बेसेडर म्हणून नियुक्ती झाली आहे. या कार्यक्रमादरम्यान शाहरुख खानने आपल्या यशात आईने दिलेला यशमंत्र कसा कामी आला याचा उलगडा केला. शाहरुख म्हणतो, ‘माझी आई मला नेहमी सांगायची- तू तुझ्या खर्चात कधीच कमी करू नकोस. उलट हा खर्च करता येईल, यासाठी पैसे कसे कमवता येतील, यासाठी वेगवेगळे मार्ग धुंडाळ.’ झालं, हा मंत्र शाहरुखने कायम लक्षात ठेवला आणि तबरहुकूम त्याने कामही केलं. त्यासाठी त्याने अभिनयाव्यतिरिक्त जाहिरात, निर्माता आणि व्यावसायिक यात लक्ष घातलं. त्यात   मिळालेल्या यशामुळे शाहरुख आज इथवर पोहोचला आहे. लोक म्हणतात, ‘जितकी आपली चादर असेल, तेवढेच पाय पसरावेत’ पण शाहरुखची आई मात्र त्याला वेगळंच काही सांगून गेली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi