Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्याच्याबद्दल 10 रोचक तथ्य

शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्याच्याबद्दल 10 रोचक तथ्य
बॉलीवूड बादशहा शाहरुख खान आज (बुधवारी) 51 वर्षाचा पूर्ण झाला आहे. वाढदिवसानिमित्त जाणून घ्या दिल्ली ते मुंबईपर्यंतचा किंग खानचा प्रवास कसा राहीला.  
 
1. शाहरुखचा जन्म 2 नोव्हेंबर 1965रोजी राजधानी दिल्लीत झाला होता.  
 
2. त्याला 'बादशहा' आणि 'किंग खान'च्या नावाने ओळखले जाते.  
 
3. शाहरुखचा लहानपणा पासूनच ऍक्टींगकडे कल होता, बरेच स्टेज परफॉर्मेंसमध्ये तो त्या काळातील ऍक्टर्सच्या अंदाजात ऍक्टींग करत होता, ज्याला प्रेक्षकांची फार पसंती मिळत होती.  
 
4. लहानपणी अभिनेत्री अमृता सिंगशी त्याची मैत्री होती नंतर ती मुंबईत येऊन चित्रपटात काम करू लागली.  
webdunia
5. शाहरुखने ऍक्टींगची शिक्षा 'बैरी जॉन' या अकादमीतून घेतली आहे.   
 
6. दिल्लीच्या हंसराज कॉलेजहून बॅचलरची डिग्री घेतल्यानंतर शाहरुखने जामिया मिलिया युनिव्हर्सिटीहून मास्टर्सचा अभ्यास सुरू केला पण  ऍक्टींगच्या जगात पाय ठेवल्यामुळे त्याला अभ्यास मध्येच सोडावा लागला.  
 
7. शाहरुखने 6 वर्षांच्या रिलेशननंतर गौरी छिब्बर (गौरी खान)शी 25 ऑक्टोबर 1991मध्ये लग्न केले आणि त्यांच्या तीन संतानं आहे, मुलगा आर्यन, अबराम आणि मुलगी सुहाना.
webdunia
8. शाहरुखने सुरुवातीत 'सर्कस' आणि 'फौजी' सारख्या मालिकेत काम केले आणि नंतर मुंबई येऊन हेमा मालिनी यांच्या निदर्शनात तयार झालेले चित्रपट 'दिल आशना है' पासून चित्रपटांमध्ये ऍक्टींगची सुरुवात केली.  
 
9. शाहरुखने 'डर' 'बाजीगर' 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', 'कभी हां कभी ना', 'करन अर्जुन', 'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम' 'चक दे' 'चेन्नई एक्सप्रेस' आणि हैप्पी न्यू ईयर सारखे चित्रपट केले आणि लवकरच त्याचे 'दिलवाले' रिलीज होणार आहे.  
 
10. चित्रपटांसोबत शाहरुखने टिव्हीच्या जगात 'केबीसी' आणि 'जोर का झटका' सारखे शो होस्ट केले आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘मिस्टर इंडिया’तील गाण्याचे ‘फोर्स 2’ मध्ये नवे व्हर्जन