Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शाहरुखच्या सेल्फीला रेकॉर्डब्रेक रिट्विट

शाहरुखच्या सेल्फीला रेकॉर्डब्रेक रिट्विट
, मंगळवार, 28 एप्रिल 2015 (11:30 IST)
बॉलीवूडच्या ‘किंग खान’ हा आता ट्विटरचादेखील ‘राजा’ झालाय असं म्हणायला हरकत नाही. शाहरुख खान आणि ब्रिटिश गायक जियान मलिक यांच्या सेल्फीने ट्विटरवर एकच धुमाकूळ घातला आहे. एखाद्या सेलिब्रेटीचा ट्विट सर्वाधिक रिट्विट होणारा हा पहिला फोटो आहे. शाहरूखचा फोटो आतापर्यंत 118,006 रिट्विट झाला आहे. तर 166, 677 लोकांनी या ट्विटला फेवरिट केले आहे.

याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सेल्फीच्या ट्विटला सर्वात जास्त रिट्विट मिळाले होते. मात्र, शाहरुखच्या या सेल्फीने सर्व विक्रम मोडित काढत एक आगळावेगळा विक्रम रचला आहे. शाहरुखने आपला ब्लॅक अँण्ड व्हाइट फोटो जियानसोबत लंडनमधील पाचव्या एशियन पुरस्कार सोहळ्यात काढला होता. जिथे या दोघांना पुरस्कार बहाल करण्यात आला. शाहरुखने या पार्टीचे काही फोटो ट्विटरवर पोस्ट केले आहेत.

शाहरुख फोटो ट्विट करताच ट्विटरवर रिट्विटचा एकच सिलसिला सुरू झाला. तसेच रिट्विटचे प्रमाण वाढतच आहे. यावरून अंदाज लावता येईल की, शाहरुखची लोकप्रियता जगाच्या कानाकोपर्‍यापर्यंत पोहोचली आहे. तसेच इतर फोटोंच्या ट्विटही मोठ्या प्रमाणात रिट्विट होत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi