Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शाहरुखच्या ‘फॅन’ची जबरदस्त कमाई

शाहरुखच्या ‘फॅन’ची जबरदस्त कमाई
शाहरुख खानचा चित्रपट फॅनने पहिल्या तीन दिवसांमध्ये 52.35 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या दोन दिवसांमध्ये फॅनने 34.60 कोटी रुपये तर रविवारी 17.75 कोटी रुपये कमावले आहेत. ट्रेड अँनेलिस्ट तरुण आदर्श यांनी ट्विटवरून ही माहिती दिली आहे. 
 
पहिल्या दिवशी एवढी कमाई करणारा फॅन हा 2016 मधला पहिलाच चित्रपट आहे. याआधी अक्षय कुमारच्या एअरलिफ्टने पहिल्या दिवशी 12.35 कोटी रुपये कमावले होते. या चित्रपटामध्ये शाहरुख खान डबल रोल मध्ये आहे. 
 
एका रोलमध्ये शाहरुख सुपरस्टार आर्यन खन्ना तर दुसर्‍या रोलमध्ये आर्यन खन्नाचा फॅन असलेला गौरव आहे. आर्यनचा फॅन असलेला गौरव त्याचा बदला कशासाठी आणि का घेतो, ही या चित्रपटाची कहाणी आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi