Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शाहरुख खान दिसणार मिशी आणि चाळशीत

शाहरुख खान दिसणार मिशी आणि चाळशीत
IFMIFM
आदित्य चोप्राच्या ‘रब ने बना दी जोड़ी’ या चित्रपटात शाहरुख खान मिशी आणि चष्म्यामध्ये दिसणार आहे. याचे चित्रीकरण नुकतेच अमृतसर येथील स्वर्ण मंदिरात झाले. चित्रपटात शाहरुख बरोबर अनुष्का शर्मा आहे. शाहरुखचे हे अनोखे रूप पाहून ही भूमिका कशी असेल याची चर्चा सुरू आहे. शाहरुख काही वेळच या वेशभूषेत दिसेल असे काहींचे म्हणणे आहे. तर तो परिपक्व भूमिका साकारत असल्याचेही बोलले जात आहे. अनुष्का मात्र, पंजाबी मुलगीचा रोल करत आहे.

शाहरुख ‘आर्मी’, ‘इंग्लिश बाबू देसी मेम’ आणि ‘पहेली’ या चित्रपटांत मिशीमध्ये दिसून आला होता. गंमतीची गोष्ट म्हणजे हे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणकून पडले होते. 12 डिसेंबराला प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटात तो काय करिश्मा दाखणार, याकडे सा-यांचे लक्ष आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi