Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शाहरूख मराठी चित्रपटसृष्टीत

रोहित शेट्टीबरोबर सहा चित्रपटांची निर्मिती?

शाहरूख मराठी चित्रपटसृष्टीत

वेबदुनिया

बॉलीवूडमधील किंग खान आता मराठी चित्रपटसृष्टीत येणार आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीसहित तो मराठीत सहा चित्रपटांची निर्मिती करणार आहे. सध्या हा विषय प्राथमिक स्तरावर आहे. साधारण जून महिन्यानंतर याबाबतची सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकते.हिंदी कलाकारांचे मराठी प्रेम लपून राहिले नाही.
WD



मराठी चित्रपटसृष्टी गेल्या काही काळापासून ग्लॅमरस होत आहे. 'दुनियादारी' आणि 'टाइमपास' या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला गोळा केला आहे. शाहरूखच्या अगोदर अक्षय कुमार आणि रितेश देशमुख यांनी मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे. शाहरूखची रेड चिलीज एंटरटेन्मेंट आणि रोहित शेट्टीचे प्रॉडक्शन हाऊस मराठी चित्रपटांची संयुक्त निर्मिती करण्याची शक्यता आहे. सध्या शाहरूख 'हॅप्पी न्यू इयर' या चित्रपटात बिझी आहे,तर रोहित शेट्टी 'सिंघम'च्या सिक्वेलमध्ये गुंतला आहे. मे महिन्यापर्यंत या दोन्ही चित्रपटांचे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतरच दोघे एकत्र बसून मराठी चित्रपटाबाबत चर्चा करतील. शाहरूख यापैकी एका चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका करू शकतो.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi