Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शाहिद आणि अनुष्काचे गुटूर्गू?

शाहिद आणि अनुष्काचे गुटूर्गू?
शाहिद कपूरचे सध्या 'रब ने बना दी जोडी' ची नायिका अनुष्का शर्मासोबत अफेअर असल्याची चर्चा सुरू आहे. दोघेही यशराज फिल्म्सच्या एका चित्रपटात काम करताहेत. त्याच्या चित्रिकरणादरम्यान दोघांची चांगली दोस्ती झाली आणि ती बरीच पुढे गेल्याचे कळते.

शाहिदच्या गोटातून मात्र या वृत्ताचा इन्कार करण्यात आला आहे. शाहिद ज्या नायिकेबरोबर काम करतो, तिच्याशी त्याचे लफडे असल्याच्या वावड्या उडत असतात. आताची बातमी अशीच वावडी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. करीना कपूरशी तुटल्यानंतर शाहिदचे नाव सानिया मिर्झा, विद्या बालन, अमृता राव व प्रियंका चोप्रासोबत जोडले गेले. आता अनुष्का शर्माचे नाव त्यात वाढले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi