Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शाहिद कपूरचा निर्णय पक्का

शाहिद कपूरचा निर्णय पक्का
IFM
आपल्या वयाला अनुसरूनच भूमिका करण्याचा निर्णय शाहिद कपूरने आपल्या वाढदिवसादिवशी घेतला आहे. तो युवकांच्यात लोकप्रिय आहे त्यामुळे या वर्गाला आवडतील अशाच भूमिका करण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.

सध्या 'कमीने' या चित्रपटाचा ट्रेलर दाखविण्यात येत आहे. यामध्ये शाहिद घोड्यावर बसून आपल्या रफ-टफ बॉडीचे प्रदर्शन करताना दिसून येत आहे. शाहिदचा हा अंदाज प्रेक्षकांना भलताच आवडलेला दिसतोय. या चित्रपटात तो हटके दिसून येणार आहे आणि यानंतर त्याची इमेज बदलेल असे काहींचे म्हणणे आहे. शाहिद याचे श्रेय दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांना देत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi