Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शाहिद कपूर प्रियंकावर संतापला

शाहिद कपूर प्रियंकावर संतापला
IFM
शाहिद कपूरचं काही खरं नाही. 'शीशा हो या दिल हो आखिर टूट जाता है' चा अनुभव त्याला याही वेळा येणार असं दिसतंय. तर शाहिदचं दुसरं प्रेम अर्थात प्रियंका चोप्रा हेही तुटण्याच्या मार्गावर आहे. नुकतीच प्रियंकाने तिच्या घरी एक पार्टी दिली होती. तीत स्कॉटिश अभिनेता गेरार्ड बटलरही होता. या बटलरने म्हणे प्रियंकाला प्रपोझ केलं नि तिला लग्नाची मागणी घातली.

आता प्रियंकाने ही मागणी किती सिरीयसली घेतली हे काही माहित नाही. या पार्टीत शाहिदही होता. त्याच्या समोरच हे घडल्याने शाहिद फारच च़डफडला. तिथे तो काही बोलू शकला नाही. पण नंतर त्याने मात्र प्रियंकाची चांगलीच 'काढली'. आता प्रियंकाची त्यावर काय प्रतिक्रिया झाली हे काही समजू शकलेलं नाही.

शाहिद, राग आवर रे. नाही तर करीनाने तुला हात दाखवला आता प्रियंकाही तेच करायची. नाही का?

Share this Story:

Follow Webdunia marathi