Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिखर धवन नच बलिएत

शिखर धवन नच बलिएत
, सोमवार, 25 मे 2015 (11:23 IST)
टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज शिखर धवन हा रियालिटी शो नच बलिए-7 मध्ये ठुमके लावणार असल्याचे कथित स्वरूपात समजते आहे. शिखर आणि त्याची पत्नी आयेशा यांना या शोच्या निर्मात्यांनी निमंत्रित केल्याचे समजते आहे. धवन आणि त्याच्या पत्नीला वाईल्ड कार्ड एंट्री दिली जाऊ शकते.
 
निर्मात्याच्या अगदी जवळील सूत्रांनी सांगितले की, ‘आम्ही शिखरच्या संपर्कात आहोत. जर तो या शोमध्ये सहभागी झाल्यास या शोला चांगलीच लोकप्रियता मिळेल.’ छोट्या पडद्यावरील स्टार प्लस या चॅनलवर प्रसारित होणार्‍या या शोची निर्माती एकता कपूर असल्याने हा शो नक्कीच हटके असणार अशीच सगळ्यांची आशा आहे. नच बलिए-7 मध्ये बॉलीवूड अभिनेत्री प्रीती ¨झटा, लेखक चेतन भगत आणि नृत्यदिग्दर्शक मारजी पेस्टनजी हे परीक्षकांची भूमिका बजावणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi