Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शूटिंगच्यावेळी खर्‍या सिंहाला आला होता अक्षयकुमारचा राग

शूटिंगच्यावेळी खर्‍या सिंहाला आला होता अक्षयकुमारचा राग
, गुरूवार, 1 ऑक्टोबर 2015 (10:49 IST)
बॉलीवूडमध्ये स्टंट करणारा आणि थरारक खेळ खेळणार्‍या अक्षयकुमारवर बाका प्रसंग आला होता. शूटिंगच्यावेळी खर्‍या सिंहाला राग आला होता. अक्षय आपल्या आगामी सिनेमा ‘सिंह इज ब्लिंग’च्यावेळी सिंहाबरोबर शूटिंग करत होता. शूटिंग ज्या सिंहाबरोबर करण्यात आले त्याचे नाव मुफासा आहे. या सिनेमात अक्षय सुरक्षा रक्षकाची भूमिका साकारत आहे. शूटिंगच्यावेळी खूप मजा आली. हे शूटिंग केपटाऊन येथील आहे. मी खर्‍या सिंहाबरोबर शूटिंग केलेय, असे अक्षयने सांगितले. मात्र, शूटिंगच्यावेळी मी खूप घाबरलेलो होतो. यावेळी सिंहाला राग आला होता. त्याने शूटिंगच्यावेळी लावलेली काच तोडून टाकली. काचेमध्ये सिंहाला वाटले दुसरा कोणतातरी सिंह आला. त्यावेळी त्याने काच तोडली. 
 
एका सीनसाठी मुफासा (सिंह) याच्यासोबत कारमधून शूटिंग केले. तो माझ्यासमोर बसला होता. ट्रेनर माझ्यापासून खूप दूर होता. त्यावेळी अक्षयने म्हटले वेळ पडल्यास मला बचावू शकशील ना? मुफासाने ठरविले तर तो काहीही करू शकतो. मात्र, आज घाबरण्याचे कारण नाही. त्याचा मूड चांगला आहे. त्याने खूप खाल्ले आहे, असे ट्रेनरने अक्षयला सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi