Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शूटिंगदरम्यान थोडक्यात बचावला अक्षयकुमार

शूटिंगदरम्यान थोडक्यात बचावला अक्षयकुमार
, शुक्रवार, 28 ऑगस्ट 2015 (10:08 IST)
बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार जीवघेणे स्टंट्स करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यासाठी तो कधी डमी वापरत नाही. पण असे करताना त्याला अनेक वेळा दुखापत होते. त्याच्या आगामी ‘सिंग इज ब्लिंग’ या सिनेमाच्या शूटिंगवेळी असा एक अपघात घडला आणि त्यातून तो थोडक्यात बचावला. 
 
काही दिवसांपूर्वीच अक्षयकुमारच्या आगामी ‘सिंग इज ब्लिंग’ या सिनेमातील ‘टुंग टुंग बजे’ हे गाणे रिलीज करण्यात आले. या गाण्यात अक्षयकुमार वेगवेगळे स्टंट्स करताना दिसतोय. यापैकी काही स्टंट्समध्ये तो आगीशी खेळताना दिसतोय. मात्र आगीसोबतचे स्टंट करताना अक्षय थोडक्यात बचावला. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमाच्या एका सीनसाठी अक्षयला फायर लूपमधून उडी घ्यायची होती. रीहर्सलदरम्यान अक्षयने अनेकदा हा स्टंट अगदी योग्यरीत्या केला. मात्र फायनल टेकच्यावेळी रिंगमधून उडी घेताना त्याच्या पायात ती रिंग अडकली आणि त्याच्या पायाला दुखापत झाली. क्रू मेंबर्सनी क्षणाचाही विलंब न करता अक्षयच्या पायाला लागलेली आग विझवली. यावेळी झालेला थोडासा उशीर मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरला होता. या घटनेचा व्हिडिओ ग्रेजिंग गोट पिक्चर्सच्या टीमने यूट्यूबवर शेअर केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi