Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संजचे वागणे बदलत नाही

संजचे वागणे बदलत नाही
, सोमवार, 21 एप्रिल 2014 (13:58 IST)
मुंबईतील 1993 च्या दहशतवादी हल्ल्यातला आरोपी संजय दत्त याची वागणूक सुधाराणी यासाठी त्याला तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असली तरी त्याच्या वागण्यात काही फरक पडत नाही, असे दिसत आहे. त्याची वागण्याची तर्‍हा दाखवणारी एक व्हीडिओ क्लीप सगळीकडेच सक्यरुलेट झाली आहे. तो सध्या रजेवर तुरुंगाच्या बाहेर आलेला आहे आणि रजेची मुदत संपताच त्याला आत जावे लागणार आहे.
 
पत्नीच्या आजारपणाचे कारण सांगून तो रजेवर आला असला तरी ते कारण काही खरे नाही आणि त्याचे या काळातले रंगढंग यथास्थित जारी आहेत. त्याने फिल्म इंडस्ट्रीजच्या लोकांसाठी पार्टी दिली होती आणि या पार्टीत तो दारूच्या नशेत धुंद होऊन वेडय़ासारखे चाळे करत होता. या त्याच्या चाळ्यांचे शूटिंग कोणीतरी केले आहे आणि त्याची क्लीप सगळीकडे पाठवली गेली आहे. या क्लीपमध्ये तो दारूच्या नशेत धुंद झालेला आहे आणि हातात प्रत्यक्षात गिटार दिसत नसली तरी ती वाजवण्याचा अभिनय तो करत आहे. असे रंगढंग करणारा कैदी बायकोची प्रकृती चांगली नसल्याचे कारण सांगून बाहेर येतो याचा अर्थ त्याच्या रजेच्या मंजुरीमध्ये काहीतरी गडबड झालेली आहे असा होतो. 

Share this Story:

Follow Webdunia marathi