Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संजय दत्तच्या बायोपिकमध्ये आमिर खान?

संजय दत्तच्या बायोपिकमध्ये आमिर खान?
, शनिवार, 27 ऑगस्ट 2016 (14:03 IST)
दिग्दर्शक राजकुमार हिरानी सध्या बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित सिनेमात व्यस्त आहे. या बायोपिकमध्ये रणबीर कपूर संजय दत्तच्या भूमिकेत दिसणार आहे. पण बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानची चित्रपटात महत्त्वाची भूमिका असल्याचं कळतं. काही वृत्तानुसार, आमिर खान या सिनेमात संजय दत्तचे वडील सुनील दत्त यांच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. राजकुमार हिरानीने जर या सिनेमात आमिरला घेतलं, तर हिंदी चित्रपटांच्या इतिहासात ही अनोखी कास्टिंग समजली जाईल. आमिर खान संजय दत्तच्या सर्वात चांगल्या मित्रांपैकी आहे, यात शंका नाही. पण आमिरचं व्यक्तिमत्त्व आणि सुनील दत्त यांचं व्यक्तिमत्त्व यात कोणतंही साम्य नाही, हेदेखील तेवढंच खरं. त्यामुळे आमिर खान या सिनेमात सुनील दत्त यांची भूमिका साकारणार का, हे लवकरच कळेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘दबंग’साठी मी निष्ठावंत