Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संजय दत्त आणि संजय गुप्ता काढणार चित्रपट

संजय दत्त आणि संजय गुप्ता काढणार चित्रपट
, बुधवार, 2 सप्टेंबर 2015 (10:00 IST)
पॅरोलवर येरवडा कारागृहातून सुटून आलेला बॉलीवूड अभिनेता संजय दत्त व संजय गुप्ता यांनी संजय शिक्षा भोगून परत आल्यानंतर चित्रपट काढण्याचा निर्णय घेतला असून हा चित्रपट अँक्शन थ्रिलर असेल असे समजते. संजय दत्तचा हा कमबॅक चित्रपट असेल. संजय दत्त आणि संजय गुप्ता यांची जोडी तशी जुनीच आहे. संजयचा पहिला चित्रपट गुप्ताबरोबरच झाला होता. 
 
संजय गुप्ता व संजय दत्त यांनी दोन चित्रपटांचे स्क्रिप्ट फायनल केले असल्याचेही सांगितले जात आहे. हे दोन्ही चित्रपट अँक्शन थ्रिलरचा आहेत. विशेष म्हणजे एकता कपूरनेही संजय दत्त व संजय गुप्ता चित्रपट काढणार असतील तर त्या प्रोजेक्टचा भाग होणे आपल्याला आवडेल असे जाहीर केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi