Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संजूबाबा पुन्हा 'मापात'

संजूबाबा पुन्हा 'मापात'
IFM
अमरसिंह हे आपले वडिल बंधू असल्याचे संजय दत्त सांगतो. म्हणूनच या मोठ्या भावाचे म्हणणेही तो टाळत नाही. अमरसिंहांनी सांगितले, राजकारणात ये, संजूबाबा आला. त्यांनी मग जे जे सांगितले, ते संजूबाबाने केले. आता अमरसिंहांनी संजूबाबाला पुन्हा एकदा करीयरवर लक्ष द्यायला सांगितलेय. मोठ्या बंधूंचे म्हणणे संजय कसे टाळणार? त्याने पुन्हा एकदा आपल्या मूळ व्यवसायाकडे लक्ष द्यायला सुरवात केलीय. पण निवडणुकांच्या काळात नेता बनलेल्या संजूबाबाचे वजन भलतेच वाढले होते. जीम सुटली आणि जीभ भलतीच सुटली होती. पण आता संजूबाबाने जीम जॉईन करून जिभेवरही नियंत्रण आणलेय. महिनाभरात त्याने बारा किलो वजन कमी केलेय. संजूबाबा जे ठरवतो ते करतोच, याचे हे आणखी एक उदाहरण.

Share this Story:

Follow Webdunia marathi