Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सनीचा ‘वन नाइट स्टँड’ नैतिकतेच्या आधारावर

सनीचा ‘वन नाइट स्टँड’ नैतिकतेच्या आधारावर
, शुक्रवार, 29 जानेवारी 2016 (10:04 IST)
पोर्नस्टार ते बॉलीवूड अभिनेत्री असा प्रवास करणारी सनी लिओन आता आणखी दोन चित्रपटात झळकणार आहे. ‘वन नाइट स्टँड’ आणि ‘बेईमान लव्ह’ हे दोन आगामी चित्रपट लवकरच रिलीज होणार आहेत. पण त्या आधी या 2 चित्रपटांबद्दल सनी लिओन काय म्हणतेय ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
 
दोन्ही चित्रपट नैतिकतेचा संदेश देणारे असल्याचं सनी लिओनीने म्हटलं आहे. त्याआधी सनीचा ‘मस्तीजादे’ चित्रपट 29 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. ‘पुरुष जर काही करू शकतात तर स्त्रिया त्यापेक्षाही चांगले काही तरी करू शकतात. तुम्ही जर महिला असल्यामुळे अडचणी येत असतील तर तुम्ही स्वत:ला सावरले पाहिजे. अशा प्रकारचा नैतिक संदेश ‘वन नाइट स्टँड’ आणि ‘बेईमान लव्ह’ मधून दिला जाईल. असं सनीचं म्हणणं आहे. ‘जिस्म 2’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये आलेल्या सनीने आजवर फक्त सेक्स संबंधीचे चित्रपट केले आहेत. ‘मस्तीजादे’ नंतरचे चित्रपट वेगवेगळ्या शैलीचे आहेत. चित्रपटाचे नाव जरी ‘वन नाइट स्टँड’ असले तरी हा एक वेगळा चित्रपट असेल. याचा ट्रेलर आल्यानंतर याचे वास्तव तुमच्या ध्यानात येईल. असंही सनीने म्हटलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi