Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सनी देओलसाठी साठ लाखांचा खर्च

सनी देओलसाठी साठ लाखांचा खर्च
IFM
चित्रपट निर्मात्यांना तयार असलेला सेट बदलायचा म्हटले की, प्रचंड दडपण येते. वेळ तर जातोच पण लाखो रुपयांचे नुकसानही सहन करावे लागते.

त्यामुळे आहे त्या परिस्थितीत काम करण्याचा त्यांचा अट्टहास असतो. पण 'राइट या रॉंग' या चित्रपटाचे निर्माते नीरज पाठक यांनी सनी देओलच्या एका सांगण्यावरून त्याच्यावर चित्रित करण्यात येणार्‍या गाण्याचा सेट बदलत यावर चक्क साठ लाख खर्च केले. आणि विशेष म्हणजे सनीचे म्हणणे त्यांना पटलेही.

दिलदार दे दुपट्टा हे गाणे सनी देओलवर चित्रित केले जात होते. त्याला या गाण्यासाठी उभा करण्यात आलेला सेट मुळीच आवडला नाही.

गाणे सुपरहिट होणारे असल्याने सेट मोठा असावा अशी त्याने नीरजला विनंती केली. आणि त्वरित नीरजने सनीचे म्हणणे ऐकत गाण्याचे चित्रीकरणच रद्द केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi