Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सलमानच्या 'किक'ची पहिल्याच आठवड्यात 150 कोटींची कमाई

सलमानच्या 'किक'ची पहिल्याच आठवड्यात 150 कोटींची कमाई
नवी दिल्ली , शुक्रवार, 1 ऑगस्ट 2014 (11:31 IST)
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या 'किक' सिनेम्याने पहिल्याच आठवड्यात सुमारे 150 कोटींची कमाई केली आहे. ईदच्या मुहुर्तावर 'किक' रिलिज झाला होता. परदेशात सुमारे 46.43 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

दुबईत 13.18 कोटी रुपयांची कमाई करण्यात चित्रपटाला यश मिळाले. तसेच पाकिस्तान, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, न्यूझीलंडमध्ये निवडक चित्रपटगृहात ‘किक’ ने बुधवारपर्यंत चांगला बिझनेस केला. त्यामुळे अरब देशांत सलमानच्या चित्रपटाला अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सिद्ध झाले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi