Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सलमानने हातनोली आदिवासी वाडीचा लूक बदलला

सलमानने हातनोली आदिवासी वाडीचा लूक बदलला
, सोमवार, 5 जानेवारी 2015 (15:37 IST)
हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा नायक सलमान खानने रायगड जिल्ह्यातील कर्जत खालापूर तालुक्यातील हातनोली आदिवासी वाडीचा चेहरा मोहरा बदलून टाकलाय. 
 
अलीकडे सलमान आपल्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी एनडी स्टुडिओमध्ये काही दिवस होता, त्यावेळी त्याचसोबत करिना कपूर, हिमेश रेशमिया आदी मंडळी होती. आपल्या चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर सलमान खानने मुंबईहून 30 जणांचा एक ग्रुप बोलवून स्वत: सलमान खानने हातनोली आदिवासीमधील 50 घरांना आपल्या हाताने कलरिंग करण्याचे सामाजिक काम केले. अवघ्या एका दिवसात आदिवासी वाडीतील सर्व घरांना वेगवेगळे कलर मारले. गावातील पाण्याची टाकी, वाचनालय, सामाजिक भवन, शौचालयासह गावातील घरांना सलमानने आपल्या कुंचल्यातून रंगरंगोटी करण्याचे काम केले. यावेळी सलमानसोबत करिना, हिमेश हेदेखील कलरिंग करण्याच्या कामात सहभागी झाले होते. 
 
हातनोली आदिवासी वाडीतील गावकरी सलमानबद्दल भरभरून बोलतात मात्र सलमानने केलेल्या या कामाचे कौतुक गावकर्‍यांना आहे. यापूर्वी याच आदिवासी वाडीमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न होता. त्यासाठी काही महिन्यांपूर्वी सलमानने गावकर्‍यांसाठी बोरवेल मारली आहे. हातनोली आदिवासी वाडीचा चेहरा मोहरा सलमानच्या रंगरंगोटीने पूर्णपणे बदलून गेलाय. एका घराच्या भिंतीवर चक्क सलमानने गणपती रंगवलाय. हे काम करताना त्याने गावकर्‍यांना स्पष्ट सांगितले की हे काम मी केले हे कोणालाही सांगू नका, मला प्रसिद्धी नको आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi