Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सलमान-लुलियाचे नाते घट्ट, कधी होणार शुभमंगल?

सलमान-लुलियाचे नाते घट्ट, कधी होणार शुभमंगल?
, शनिवार, 14 मे 2016 (10:06 IST)
बॉलिवूडचा मोस्ट एलिजेबल बॅचलर सलमान खान आपली ही बिरुदावली पुसून टाकायच्या मन:स्थितीत आहे. त्याची रुमानियन मैत्रीण लुलिया वंटूर आणि सलमान नेहमी एकत्र भेटतात अशी चर्चा असते. पण विमानतळावर सर्वासमक्ष दोघांनी दर्शन दिले आणि दोघे विवाह बंधनात अडकणार आहेत या बातमीला पुष्टी मिळाली. सलमान आणि लुलियाचे प्रेमप्रकरण बॉलिवूडसाठी नवे नाही. हे सत्य असावे अशीच अपेक्षा आहे. मुंबई विमानतळावर दोघे एकत्र दिसल्यानंतर आशेचा किरण दिसू लागला आहे.
 
विमानतळावर सलमान लुलियासोबत एकटाच नव्हता तर त्याची बहीण अल्विराही त्यांच्यासोबत होती. चंदिगडमध्ये सुटी घालवल्यानंतर तिघे मुंबईला परतले. विमानतळावरुन गाडीकडे चालत जात असताना सलमानच्या बहिणीने लुलियाचा हात घट्ट पकडला होता. खान फॅमिलीचे जयपूरमधील मित्र बिना काक यांच्या घरीही सलमान गेला होता. बिना काक यांनी लुलियाचा एक फोटोही शेअर केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सैराटची आतापर्यंत 47 कोटींची कमाई