Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'सिंघम रिटर्न्स' प्रदर्शित होऊ देणार नाही; हिंदू संघटनांचा इशारा

'सिंघम रिटर्न्स' प्रदर्शित होऊ देणार नाही; हिंदू संघटनांचा इशारा
मुंबई , सोमवार, 28 जुलै 2014 (16:36 IST)
येत्या 15 ऑगस्टला प्रदर्शित होणारा 'सिंघम रिटर्न्स' एका नव्या वादात अडकला आहे. त्यामुळे दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या समोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. हिंदू जनजागृती समितीने सेन्सॉर बोर्डाकडून या सिनेमावर बंदी आणण्याची मागणी केली आहे.

सिंघम रिटर्न्स सिनेमात हिंदू साधुंचा अवमान करण्‍याचा आल्याचे हिंदू संघटनांनी म्हटले आहे. त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावण्याची शक्यता नाकारता येत नाही. 'सिंघम रिटर्न्स'च्या ट्रेलरमध्ये एका हिंदू साधूला व्हिलनच्या रुपात सादर करण्यात आल्याचे हिंदू जनजागृती समितीचे सचिव रमेश शिंदे यांनी सांगितले आहे. 

जर सिनेमाच्या प्रोड्युसरनं हिंदू साधुंचा अपमान करणारे सीन काढल्याशिवाय हा सिनेमा प्रदर्शित केला तर या सिनेमावर आम्ही पूर्ण देशभर बंदी आणू' असे रमेश शिंदे यांनी इशारा दिला आहे.

एका पोलिस अधिकार्‍याच्या भूमिकेत दिसणार अभिनेता अजय देवगन संतांना मारण्याची भाषा केल्याचे दाखवण्यात आले आहे. परंतु, खाकी ड्रेसमध्ये मस्जिद जातो तिथे डोके टेकवतो आणि मौलवीला सलाम करतो, अशी दृश्ये सिंघम रिटर्न्समध्ये दाकवण्‍यात आली आहेत. यामुळे हिंदू धर्माबाबत चुकीची धारणा लोकांत निर्माण होत असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi