Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुनील शेट्टीच्या कन्येची एन्ट्री

सुनील शेट्टीच्या कन्येची एन्ट्री
, सोमवार, 21 एप्रिल 2014 (13:56 IST)
सूरज पांचोली सध्या आपल्या पहिल्या ‘हिरो’ या बॉलिवूड सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सिनेमाची शूटिंग मनालीमध्ये चालू आहे. या सिनेमामध्ये त्याची को-स्टार अथिया शेट्टी असून ती सुनील शेट्टीची मुलगी आहे. तसेच सूरज बॉलिवूड स्टार आदित्य पांचोलीचा मुलगा आहे. बॉलिवूड अभिनेत्री जिया खानच्या मृत्यूनंतर सूरजचे नाव चर्चेत आले होते. कारण तो जियाचा बॉयफ्रेंड होता.

2 जून 2013 ला जेव्हा जियाचा मृतदेह तिच्या घरात आढळून आला तेव्हा सूरजला संशयित म्हणून अटक करण्यात आली होती. जियाला आत्महत्या करण्यासाठी भाग पाडण्याचा आरोप लावून तक्रार दाखल करून सूरजला ताब्यात घेण्यात आले होते. परंतु काही दिवसांनंतर त्याला जामिनाच्या आधारे तुरूंगातून सुटका मिळाली. सूरजने तुरूंगाच्या बाहेर येताच आपल्या बॉलिवूड पदार्पणाच्या सिनेमावर काम करण्यास सुरूवात केली.

‘हिरो’ सिनेमा सलमान खानच्या प्रॉडक्शनखाली बनवला जात असून मनालीमध्ये चालू असलेल्या शूटिंगदरम्यान अथिया आणि सूरजचे एक छायाचित्र कॅमेर्‍यात कैद करण्यात आले. या छायाचित्रात सूरजच्या चेहर्‍यावर रक्ताचे डाग असून अथिया मस्तीभर्‍या अंदाजात दिसत आहे. या सिनेमातून सूरज आणि अथिया आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात करणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi