Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुष्मितासुद्धा मल्लिकाची प्रशंसक

सुष्मितासुद्धा मल्लिकाची प्रशंसक
मल्लिकांच्या प्रशंसकांमध्ये आता सुष्मिता सेनचे नावही सामील झाले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुष्मिता आणि मल्लिकाची कधीही समोरासमोर भेटलेल्या नाहीत. त्यांनी एकमेकींचा चित्रपटही पाहिलेला नाही.

मल्लिकाने ‍आपले करियर कोणत्याही गॉडफादरची मदत न घेता बनविले हे फार प्रशंसनीय आहे. एका छोट्या शहरातून येऊन तेही घरातील लोकांच्या विरोधाची पर्वा न करता तिने अभिनेत्री बनण्याचे आपले स्वप्न साकार केले ही फार मोठी बाब आहे, असे मत सुष्मिताने व्यक्त केले आहे.

सुष्मिताजवळ सध्या फार चित्रपट नाहीत. तिला अपेक्षित यशही अद्याप मिळालेले नाही. कोणाला लवकर यश मिळते, तर कोणाला उशीरा, हेच तर जीवन आहे, अशा तत्ववेत्त्याचा थाटात सुष्मिता याचे स्पष्टीकरण देते.

Share this Story:

Follow Webdunia marathi